कोजागरी पौर्णिमेनिमित्त (Kojagari Pournima) श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सवासाठी (Navratri Festival, Tuljapur) सोलापूर शहर-जिल्ह्यातील व कर्नाटकातील लाखो भाविक दर्शनासाठी (darshan)पायी चालत जाण्याची परंपरा आहे. यावेळी भाविकांची (devotee )मोठ्या प्रमाणात गर्दी होते. महत्वची बाब म्हणजे 9 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा व 10 ऑक्टोबरला मंदिर पोर्णिमा आहे. त्यामुळे त्या मार्गावरील वाहनांसाठी (vehicles) पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे.
दरम्यान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत. लाखो भाविक पौर्णिमेला येत असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा वाहतूक बदल शुक्रवारी (7 ऑक्टोबर) पासून 10 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे. तसेच 7 ते 10 ऑक्टोबर या काळात तुळजापूर घाट हा वाहतुकीस बंद राहील, असेही आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगणा रणावतची राजकारणात एन्ट्री? शनिवारी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
दरम्यान तुळजापूर-सोलापूर या मार्गावरील वाहनांसाठी तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. इतकंच नाही तर तुळजापूर ते बार्शीकडे येणाऱ्या वाहनांना तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या मार्गावरून प्रवास करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन व अत्यावश्यक सेवेतील वाहने, एस.टी. बस, या वाहनांसाठी हा आदेश बंधनकारक नाही.
Rain Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज; ‘या’ भागात ‘यलो अलर्ट’
वाहनांसाठी असा असेल पर्यायी मार्ग…
1) तुळजापूरवरून सोलापूरकडे येणारी वाहने मंगरुळपाटी हटकल, बोरामणी असा प्रवास करतील.
2) तर दुसरीकडे सोलापूरवरून तुळजापूरकडे जाणारी वाहने बोरामणी, इटकळ मंगरुळपाटी मार्ग प्रवास करतील.
3) तसेच तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतुक तुळजापूर, उस्मानाबाद, पैराम, बार्शी मार्गे आणि बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहने बार्शी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर मार्गे ये-जा करतील.
नवरात्रीमुळे केळीच्या दरात झाली वाढ, परंतु व्यापारी वर्ग चिंतेत