Site icon e लोकहित | Marathi News

गहू काढणीसाठी ‘हे’ कृषी यंत्र ठरतंय फायदेशीर; कमी वेळात आणि कमी पैशात होते जास्त काम

'This' agricultural machine is beneficial for harvesting wheat; More work done in less time and less money

रब्बी हंगाम (Rabbi Season) संपत आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र गहू काढणी (wheat harvest) सुरू आहे. मात्र सध्या मजुरांचा तुटवडा पडत आहे आणि मोठ्या क्षेत्रात विळ्याने पीक कापायला वेळ लागतो. यामुळे अनेक कंपन्यांनी विविध क्रॉप कटिंग मशिन्स बाजारात आणल्या आहेत. या यंत्राला कापणी यंत्र असे म्हणतात. यातून गहू,ज्वारी, धान, धने यांची कापणी चांगल्या पद्धतीने करता येते. इतकंच नाही तर या यंत्राचे ब्लेड बदलून तुम्ही मका देखील कापू शकता. या मशीनची किंमत 15 हजार ते 40 हजार आहे.

मोठी बातमी! अदानी समुहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स SBI कडे गहाण

कापणी यंत्राचे फायदे (Cutting machine)

1) छोटे-मोठे शेतकरी या यंत्राच्या सहाय्याने स्वतःचे पीक काढू शकतात. तसेच यातून मोठी कमाई देखील करू शकतात.
2) हे यंत्र अतिशय कमी तेल वापरते. यामुळे कमी पैशात जास्त काम होते.
3) या यंत्रामुळे मजुरीवर जास्त खर्च होत नाही.
4) हे यंत्र खूप हलके असून त्याचे वजन 8-10 किलो इतकेच आहे. त्यामुळे ते सहज वापरता येते.
5) या यंत्राचा वापर करून तुम्ही एकरी 1500 ते 1800 रुपये कमवू शकता.

गौतम अदानींमुळे वीज आणखी महागणार, छगन भुजबळ यांचे वक्तव्य चर्चेत

हे कापणी यंत्र वापरताना पीकानुसार ब्लेड सेट करावे लागते. यामध्ये जाड आणि कठीण झाडे कापण्यासाठी अधिक दात असलेल्या ब्लेडचा वापर केला जातो. तसेच रोपांची छाटणी करण्यासाठी कमी दात असलेले ब्लेड वापरले जातात. इतकंच नाही तर हे मशिन घेतल्यानंतर तुम्ही ५ वर्षे सहज वापरू शकता. याचा देखभाल खर्च देखील जास्त नाही. यामुळे पिकांच्या कढणीसाठी कापणी यंत्र फायदेशीर आहे.

एक मुलगा असूनसुद्धा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा लग्नगाठ बांधणार; ‘या’ दिवशी करणार लग्न

Spread the love
Exit mobile version