Site icon e लोकहित | Marathi News

Pune: उद्यापासून पुण्यातील ‘ही’ बँक होणार कायमची बंद, कारण…

'This' bank in Pune will be permanently closed from tomorrow, because...

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (RUPI bank) पुणेला (pune) 22 सप्टेंबरपासून बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जर तुमचे या बँकेत खाते असल्यास त्यातील पैसे ताबडतोब काढा. कारण 22 सप्टेंबरनंतर तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नाही. रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यामुळे टाळे (closed bank) लागणार आहे.

Sugar factory: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील साखर कारखाने लवकरच होणार सुरू

RBI च्या म्हणण्यानुसार, रुपी सहकारी बँक लिमिटेडची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट होती आणि बँकेकडे कोणतेही भांडवल शिल्लक नव्हते. यामुळे केंद्रीय बँकेने त्यांचा बँकिंग परवाना रद्द केला. रिझर्व्ह बँकेने ग्राहकांना याबाबत 10 ऑगस्ट रोजीच एक प्रसिद्धीपत्रक जारी करून याबाबत माहिती दिली होती.

Anil Kapoor: “कोणत्या तीन गोष्टींमुळे तुम्ही अधिक तरुण दिसता?” प्रश्न विचारताच अनिल कपूर म्हणाले, “सेक्स, सेक्स, सेक्स.”

यामध्ये रुपी सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना 6 आठवड्यांनंतर रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं होतं. यानंतर बँकेच्या सर्व शाखा बंद होतील आणि ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे आता 22 सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून रिझर्व्ह बँकेचे आदेश लागू होणार असून रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज ठप्प होणार आहे.

Sushma Aandhare: “आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा केवळ बालीश चाळे”, शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Spread the love
Exit mobile version