दिल्ली मधील दुधाची प्रमुख पुरवठादार कंपनी मदर डेअरीने ( Mother Dairy) दुधाच्या दरात दोन रुपये प्रतिलीटरने वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने दुधाचे दर वाढवण्यात आले असल्याची माहिती मदर डेअरीने दिली असून, या डेअरीने एकाच वर्षात पाचव्यांदा दुधाच्या दरात ( Milk rate) वाढ केली आहे. या डेअरीमधून पॉलिपॅक आणि व्हेडिंग मशीनद्वारे दररोज सुमारे 30 लाख लिटर दुधाचा पुरवठा होतो.
बिग ब्रेकिंग! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडली
फक्त दुधाचेच नाही तर इतर उपदनांचे दर देखील मदर डेअरीने वाढवले आहेत. यामध्ये फुल क्रीम दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे तर टोन्ड दुधाची किंमत 51 रुपयांवरून 53 रुपये प्रतिलिटर केली आहे. याशिवाय दुहेरी टोन्ड दुधाची किंमत सुद्धा 45 रुपयांवरून 47 रुपये प्रतिलिटर करण्यात आली आहे. या नवीन किंमती आज ( दि.27) पासून दिल्ली NCR मध्ये लागू होणार असल्याची माहिती मदर डेअरीकडून देण्यात आली आहे.
कुत्र्याच्या एका चुकीमुळे मालकाचे नुकसान! संपूर्ण घर जळून खाक
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कच्च्या दुधाच्या खरेदी किंमतीत वाढ झाली आहे. ही वाढ सुमारे 24 टक्क्यांनी झालेली दिसून येते. दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात वाढ झाल्याने कंपनीच्या देखील खर्चात वाढ झाली आहे. मदर डेअरी शेतकऱ्यांना योग्य भाव देण्यासाठी वचनबद्ध असल्याने त्यांना दुधाच्या दरात वाढ करावी लागली आहे. याआधी देखील डेअरीकडून दुधाच्या ठराविक प्रकारांत वाढ करण्यात आली होती. मदर डेअरीच्या या निर्णयाने ग्राहकांच्या घरगुती बजेटला फटका बसणार आहे.