
मागील बऱ्याच दिवसांपासून पंकजा मुंडे ( Pankja Munde) यांना भाजपकडून सातत्याने डावलले जात आहे. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा कायम होत असतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जेष्ठ कन्या पंकजा मुंडे भाजपामधील एक महत्त्वाच्या नेत्या आहेत. परंतु, त्या भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती मागील काही दिवसांत समोर येत होती. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय.
पुण्यात कोयता गँगची दहशद सुरुच! मार्केट यार्ड परिसरामध्ये केली गाड्यांची तोडफोड
चंद्रशेखर बनवकुळे म्हणाले, भाजपच्याच नेत्यांकडून पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचा कट रचला जात आहे. असं बावनकुळे म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीसांनी घरी जाऊन घेतली धंनजय मुंडे यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सध्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी मराठवाड्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रचारसभा घेतायेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.