
मुंबई : अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ (Pushpa movie) हा चित्रपट इतका गाजला होता की प्रेक्षकांच्या तोंडात पुष्पाचीच चर्चा. दरम्यान आता चाहत्यांसाठी आणखी एक गोड बातमी म्हणजे थोड्याच दिवसात ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दलचे सगळे अपडेट्स या चित्रपटाची टीम चाहत्यांना देत आहे. विशेष म्हणजे आता या चित्रपटात एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची (Bollywood actor) एंट्री होणार आहे. खरतर ‘पुष्पा’चा शेवट अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) डॅशिंग स्टाईलने करण्यात आला होता.
सुवर्णसंधी! ‘या’ शेतकऱ्यांना जिंकता येणार 5 लाखांचे बक्षीस, असा करा अर्ज
त्यामुळे ‘पुष्पा 2’ या चित्रपटाच्या पूढील भागात पोलिस आणि पुष्पा यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महत्वाची बाब ‘पुष्पा 2’ला बॉलिवूड टच देण्यासाठी निर्माते अर्जुन कपूरला (Arjun kapoor) चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात अर्जुन पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. परंतु अर्जुनच्या पात्राची छटा नकारात्मक असेल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.
Rakhi Sawant: “मला मुख्यमंत्री बनवा”, राखी सावंतने केली अजब-गजब मागणी, व्हिडिओ व्हायरल
अर्जुन कपूरचा हा पहिलाच तेलुगू चित्रपट असेल.परंतु अद्याप अर्जुनकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान काही दिवसांपूर्वी अभिनेत्री साई पल्लवी ही ‘पुष्पा: द रुल’चा भाग बनणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ‘पुष्पा’चे निर्माते रविशंकर यांनी एका मुलाखतीत या बातम्या खोट्या असल्याचे सांगत साई पल्लवी या चित्रपटात दिसणार नसल्याचे स्पष्ट केले.
बापरे! चक्क म्हशींनी फोडलं वंदे भारत एक्सप्रेसचं नाक, 147 कलमानुसार मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल