आधीच्या काळात शेताच्या कामांमध्ये बैलाला विशेष महत्त्व होते. मात्र अलीकडे तंत्रज्ञानात प्रगती झाल्याने बैलांचा वापर फार कमी झाला आहे. परंतु, असे असले तरीही बैलांच्या काही जाती आजही विशेष प्रसिद्ध आहेत. ओंगोल ही बैलाची जात त्यांपैकीच एक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण या बैलाच्या जातीची किंमत 50 लाख इतकी आहे. आंध्र प्रदेशातील ( Aandhra Pradesh) प्रकाशम जिल्ह्यात या जातीचे बैल ( Bull) आहेत.
गौतमी पाटीलच्या ‘त्या’ व्हिडीओ प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाने घेतली दखल
म्हणून ओंगोल बैलाची किंमत आहे जास्त
1) ओंगोले बैल सामान्य गुरांना होणाऱ्या अनेक रोगांपासून मुक्त आहेत.
2) ओंगोल बैलांमध्ये पाय आणि तोंडाचे आजार होत नाहीत.
3) माड गायसारखा गुरांचा सर्वात धोकादायक रोग देखील ओंगोलला हानी पोहोचवत नाही.
4) ओंगोल्स अतिशय निरोगी आणि बलवान आहेत.
5) ओंगोल ही बैलाची भारतातील प्राचीन जात आहे.
आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु
ओंगोल बैल खेळांमध्ये वापरले जातात. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये बैलांच्या लढाईत या बैलांचा वापर केला जातो. या बैलांकडे लढण्याची क्षमता जास्त असल्याने त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. 2002 मधील राष्ट्रीय खेळांमध्ये या जातीच्या बैलांना शुभंकराचा दर्जा देण्यात आला होता. ओंगोलचे वजन सुमारे अर्धा टन आहे आणि उंची 1.7 मीटर पर्यंत आहे.
गौतमी पाटीलचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल