मुंबई : आपल्याकडे शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन (animal husbandry) व्यवसाय केला जातो. पशुपालन करताना पशुपालकांना अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. चांगल्या दुधासाठी देशी गायी फायदेशीर ठरतात. आपल्याकडे बरेच शेतकरी आपल्या गायींच्या वासरांची काळजी घेऊन त्यांची गायी बनवत असतात.
देशी गायी (Native cows) पशुपालकांसाठी फायदेशीर ठरते पण यासाठी वासरांची वाढ होणे देखील खूप गरजेचे असते. वासरांची वाढ खुंटते या समस्येला बऱ्याच शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. याची नेमकी कारणे कोणती? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुयात.
Heart Attack: शरीरावर ‘ही’ लक्षण जाणवतात? सावधान येऊ शकतो हार्टअटॅक
या कारणाने वासरांची वाढ खुंटते –
पशुपालकांकडे निकृष्ट प्रकारचा चारा उपलब्ध असतो पण फक्त या चाऱ्यावर वासरांची पूर्ण वाढ होत नाही. त्यामुळे वासरांची लवकर वाढ होण्यासाठी प्रथिनयुक्त आहाराची गरज असते.
वासरांच्या शरीरातील जंत रक्त पितात, वासराने पचवलेले अन्न खातात. त्यामुळे पचवलेले अन्नसुद्धा वासरांच्या शरीरात नीटजात नाही, त्यामुळे देखील वाढ खुंटते. गोचिड, पिसवा, उवा वासराचे रक्त पिऊन वाढतात. त्यामुळे वासरांचे चारा खाण्यावरील लक्ष कमी होऊन त्यांची वाढ खुंटते.
दिलासादायक! लम्पीने संक्रमित गुरांच्या उपचाराचा खर्च महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग करणार; वाचा सविस्तर
गोठ्यातील मोठी जनावरे लहान वासरांना चारा, खाद्य खाऊ देत नाहीत त्यामुळे त्यांचे कुपोषण होऊन वाढ खुंटते. वासरांना एक ठकाणी बांधून ठेवल्यामुळे त्यांचा शरीराचा व्यायाम होत नाही त्यामुळे देखील वाढ खुंटते. त्यामुळे वासरांना शक्यतो मोकळे ठेवावे.