वाढती लोकसंख्या ही संपूर्ण जगाला भेडसावत असलेली समस्या आहे. यावर उपाय म्हणून बहुतेक देशांमध्ये कुटूंब नियोजनाबाबत जनजागृती केली जात आहे. झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या या जगात आता कुटुंब नियोजनाच्या साधनांना महत्त्व प्राप्त झाले आहे. कंडोम हे कुटुंब नियोजनासाठी (Family Planning) मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे साधन आहे. बाजारात अनेक कंपन्याचे कंडोम सहज उपलब्ध होतात.
आदिल खानविरोधात लढण्यासाठी राखी सावंतला दिला ‘या’ राजकीय पक्षाने पाठिंबा
जगभरात कंडोमचा (condom) प्रसार व्हावा यासाठी विविध देशांमध्ये कंडोमविषयी जनजागृती केली जाते. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील अनेक संघटना देखील यासाठी काम करत आहेत. यामुळे कंडोमच्या वापरात वाढ झाली आहे. दरम्यान स्टेटिस्टाच्या 2021 च्या सर्वेक्षणानुसार ब्राझील देश कंडोम वापरण्यात आघाडीवर आहे. ब्राझीलच्या लोकसंख्येपैकी 65 टक्के लोक कंडोम वापरतात. या पाठोपाठ दक्षिण आफ्रिका, थायलंड आणि इंडोनेशिया हे देश आहेत.
कांद्याला भाव नाही म्हणून संतापला शेतकरी, घेतलं स्वतःच तोंड झोडून; पाहा व्हिडीओ
महत्त्वाची बाब म्हणजे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या चीन या देशात कंडोमची सर्वाधिक विक्री केली जाते. तसेच भारतात लोकसंख्या जास्त असल्याने येथेसुद्धा कंडोमची बाजारपेठ खूप मोठी आहे. AC Nielsen च्या मते, 2020 मध्ये भारतातील कंडोमची बाजारपेठ अंदाजे 180 दशलक्ष डॉलर इतकी होती. कंडोम वापरणाऱ्यांच्या यादीत भारत मागे असला तरी भारतात कंडोमची विक्री मोठ्या प्रमाणात होते.