‘हे’ जोडपे झाले ‘रातोरात मालामाल’! किचनच्या फरशीखाली सापडली जुनी नाणी

'This' couple became 'overnight goods'! Old coins found under the kitchen floor

कधी कोणाच्या आयुष्यात काय होईल हे सांगता येणं अवघडच असतं. परिस्थिती आणि वेळेच गणित कुणालाच माहीत नसतं. काळ कधी आपल्याला साथ देतो तर कधी सोडून देतो. पण म्हणतात ना ‘उपरवाला देता है तब छप्पर फाडके देता है’ ! अगदी काहीसा प्रकार लंडनमध्ये (Landon) घडला आहे. तेथील एका जोडप्याला त्यांच्याच घरात चक्क सात कोटी रुपयांची जुनी सोन्याची नाणी सापडली आहेत. या घटनेने हे जोडपं ‘रातोरात मालामाल’ झालं आहे, असं म्हंटल तरी वावग ठरणार नाही.

“…म्हणून कार्यक्रम सुरू असतानाच शरद पवार झाले भावूक”; काय झाले असेल? वाचा सविस्तर

त्याच झालं असं की लंडन येथील नॉर्थ यॉर्कशायर येथील एका जोडप्याला त्यांच्या घराच्या दुरुस्ती दरम्यान 264 सोन्याची नाणी सापडली आहेत. ही दुर्मिळ नाणी किचनच्या फरशीखाली 6 इंच गाडली गेली होती. एका पातेल्यात ही नाणी ठेवली गेली होती. ही नाणी सापडल्यानंतर या जोडप्याने लंडनमधील एका लिलाव कंपनीशी संपर्क साधला होता. यानंतर त्यांना मिळालेली माहिती ही धक्कादायक होती.

दरोड्याच्या गुन्ह्यांत श्रीगोंद्यातील तिघांना अटक; वाचा सविस्तर

लिलाव कंपनीतील काही लोक या जोडप्याच्या घरी आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६१० ते १७२७ या काळातील ही नाणी आहेत. सुमारे 300 वर्षे जुनी नाणी अलीकडेच 7 कोटी रुपयांना विकली गेली आहेत. खरंतर ही नाणी फर्नले-मीस्टर्स या श्रीमंत कुटुंबाची आहेत. ते ३०० वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती ( Famous Industrialist) होते. या कुटुंबातील सदस्य राजकारणतही गेले होते. या कुटुंबाचे प्रमुख १७ व्या शतकाच्या सुरुवातीस व्हिग पक्षाचे सुप्रसिद्ध नेते होते.

जनावरांची खरेदी-विक्री करा फक्त एका क्लिकवर; खास पशुपालनासाठी नवे अ‍ॅप!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *