मुंबई : पावसाळा सुरू असला तरी काही दिवसापासून वातावरणात खुप बदल झाला आहे. बदल पाहायचा म्हणल तर पाऊस प्रमाण कमी झालं असलं तरी धुक्याच प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यातली त्यात सकाळी धुकं आणि दिवसभर कडक ऊन पडतय. त्यामुळे याचा परिणाम पिकावर होतं आहे. पिकाच्या पानावर सकाळी दवं बिंदू साठल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.आणि महत्वाचं म्हणजे या वातावरणात बुरशीचे बिजाणू लवकर वाढतात.दरम्यान याचाच परिणाम वेगवेगळ्या बुरशी रोगाचा प्रादुर्भाव पिकावर होतं आहे.
Amit Shah: ५ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार; राज ठाकरेंच्या भेटीची शक्यता
या रोगांचा परिणाम
पिकांवर ब्लाईट,दहिया, डाउनी मिल्ड्यू , एन्थ्रेक्नोज या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहेत.तसेच किडिंची संख्या पण कमी होते धुकं जास्त वेळ राहिल्या मुळे पिकाची प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते त्याचा परिणाम उत्पादन वर होतो.तसेच अधिक थंडी मुळे पिकाची वाढ थांबते व फळ फुलांची गळ होते.
Anupam Kher: सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अनुपम खेर नाराज, ट्विट करत म्हणाले…
ही काळजी घ्यायला हवी ?
१)महत्वाचं म्हणजे पूर्ण धुकं हाटेपर्यंत कीटकनाशक फवारणी करता येत नाही.
२)बुरशीच्या प्रादुर्भाव पाहून बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
३)शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण, सुकलेले लाकूड आदी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेला पेटवून धूर करावा.
४)त्यामध्ये दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे आणि पिकाला थोडे पाणी द्यावे. शेतात पाणी सोडल्याने तापमान ०.५ ते २ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते.
५) ज्या दिवशी धुके पडण्याची शक्यता असेल त्या दिवशी पाण्यात विरघळणाऱ्या गंधक पावडरीची (८० टक्के) ४० ग्रॅम प्रति १५ लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
६)धुक्याचा प्रभाव कमी करण्यासाठी दरवर्षी शेतात अल्प प्रमाणात वाळू मिसळावी.
७) शिंपडून टाकावीत स्युडोमोनस फ्लुरोसन्स एक किलो प्रति एकर प्रमाणात फवारावे..