Rahul Gandhi | मागील काही दिवसांपासून राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. लवकरच लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. आगामी निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांविरोधात सर्व विरोधक एकवटले आहेत. आज बंगळुरुमध्ये सर्व विरोधक एकत्र आले होते. या बैठकीसाठी 26 विरोधी पक्ष उपस्थित राहिले होते. (Latest Marathi News)
Cricket | क्रिकेट प्रेमींसाठी समोर आली आनंददायक बातमी
या बैठकीनंतर सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. “देशाचा आवाज दाबला जात असल्याने आमचा हा लढा देशासाठी आहे, विरोधकांच्या ऐक्याला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स म्हणजेच INDIA हे नाव निवडण्यात आले आहे. ही लढाई नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भारत यांच्यात आहे,” असे राहुल गांधी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
अदानी समूहाची बदनामी करण्यासाठी हिंडनबर्गने चुकीचा रिपोर्ट दिला, गौतम अदानींचा गंभीर आरोप
हा संघर्ष नरेंद्र मोदींची विचारधारा आणि भारत यांच्यामधील आहे. दरम्यान, यापूर्वी UPA नावाखाली एकत्र येणारे विरोधक आता INDIA या नावाखाली एकत्र येणार आहेत. विरोधकांची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. लवकरच आगामी निवडणुकीसाठी दिल्ली येथे सचिवालय स्थापन केले जाणार आहे. तसेच यासाठी 11 जणांची समितीही स्थापन करण्यात येणार आहे.
Uddhav Thackeray । विधिमंडळातलं चित्र बदलणार?, उद्धव ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसणार?
हे ही पहा