Site icon e लोकहित | Marathi News

“हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही तासांच….”, आदित्य ठाकरे यांचं भाकीत

"This government is not for a few months, not for a few days but only for a few hours...", Aditya Thackeray's prediction

ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली असून ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने ठाणे या ठिकाणी जनप्रक्षोभ मोर्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर निशाणा साधला आहे.

धक्कादायक घटना! ऊस तोडीतील अल्पवयीन मुलीवर मुकादमाच्याच मुलाने केला बलात्कार

आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही. तर काही तासांचं आहे. त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर गद्दार गँगचे जे अधिकारी आहेत त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नव्हे तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि जेलभरु. त्यांना जेलमध्ये टाकू, असा असा गंभीर इशारा यावेळी भाषण करताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिला आहे.

बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळणार नाही, आमदार रोहित पवार यांनी केला मोठा दावा

“लोकांमध्ये संताप दिसतोय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली आहे. सगळे मला थम्स अप करुन सांगतात की तुमच्यासोबत आम्ही आहोत.” असं देखील आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

राज्य सरकारने अवकाळी पावसाबाबत शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय!

Spread the love
Exit mobile version