मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shaha) 4 आणि 5 ऑगस्ट रोजी मुंबई (mumbai) दौऱ्यावर होते. दरम्यान यावेळी त्यांनी मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पण अमित शहांच्या या मुंबई दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षेबाबत (security) मोठी चूक झाली असल्याचे समोर आले आहे. नेमकी काय चूक झाली ते पाहू. मागील दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी शहांनी मुंबईच्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
तसेच अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या शासकीय निवासस्थानी देखील भेट घेतली होती. दरम्यान अमित शहांच्या या मुंबई दौऱ्यात त्यांना मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली होती. परंतु यावेळी एक व्यक्ती आंध्र प्रदेशातील एका खासदारांचा PA असल्याचे सांगत बराच वेळ अमित शहांच्या अवती भवती फिरत होता.
‘या’ पद्धतीने करा कोंबडखताचा वापर, पीक येईल जोमात; वाचा सविस्तर
दरम्यान या व्यक्तीवर संशय आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान हेमंत पवार असं या व्यक्तीचे नाव असून तो धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे. दरम्यान पोलिसांनी त्याला गिरगाव कोर्टासमोर हजर केलं. कोर्टानं हेमंत पवार याना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शाह यांच्या अवतीभवती फिरण्याचा त्याचा नेमका हेतू काय होता याची चौकशी पोलीस करत आहेत.
Sara Ali Khan: चक्क हेअरस्टायलिस्टसोबत सारा अली खानने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून येईल हसू