ठाकरे गटाच्या महाराष्ट्र सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पोळ (Ayodhya Paul) यांच्यावर ठाण्यात शाई फेक करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी ही घटना घडली. अयोध्या पोळ यांच्यावर फक्त शाईफेकच नाही तर त्यांना मारहाण देखील करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कळवा येथे ही घटना घडली. यानंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
शेवटी प्रेमच ते! लग्नाच्या 7 दिवसानंतर नववधूने ठोकली प्रियकरासोबत धूम; दागिने, पैसेही केले लंपास
ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यामध्येच आता ठाकरे गटाचे नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे म्हणाले, “अयोध्या पोळ यांना मारहाण हे नामर्दनगीचं लक्षण आहे. अयोध्या पोळ ही अजून त्वेषाने लढेल. तिची खोटे बोलून एकटीला घेऊन 200 जणांनी मारलं तिथे आमचे 50 जरी असते तरी पुरून उरले असते, असं दानवे म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते.