
महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी ( Friendship) आजही लोकप्रिय आहे. मराठी चित्रपटसृष्टी मधील धडाकेबाज अभिनेते म्हणून या दोघांना ओळखले जाते. या दोघांनी मिळून अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे खऱ्या आयुष्यात देखील हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. दरम्यान महेश कोठारे ( Mahesh Kothare) यांच्या जीवनप्रवासावरील ‘डॅम ईट आणि बरच काही’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पार पडले. या पुस्तकात महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे ( Lakshmikant Berde) यांचे भरपूर किस्से आहेत.
कांद्यावर रोग आलाय? टाक्या किडीने पिकाचे नुकसान होत आहे… तर चिंता करू नका; ‘हे’ उपाय करून पहा
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात महेश कोठारे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबतच्या आठवणी सांगितल्या. महेश आणि लक्ष्मीकांत यांनी धुमधडका या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम केले होते. महेश कोठारे यांच्या या सिनेमात लक्ष्मीकांत यांचा प्रवेश कसा झाला याबाबत त्यांनी ‘डॅम ईट’ या पुस्तकात उल्लेख केला आहे. हा किस्सा कार्यक्रमात निवेदिता सराफ यांनी वाचून दाखवला आहे.
महिला तहसीलदाराला जाळण्याचा प्रयत्न; सख्ख्या वहिनीनेच रचला कट
‘बबन प्रभू यांच्या स्मरणार्थ ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकाचे मूळ संचातील प्रयोग करण्याचं ठरलं. त्यावेळी बबन प्रभू यांनी साकारलेली भूमिका वठवण्यासाठी कलाकार मिळत नव्हता. काही दिवसांनी ही भूमिका साकारण्यासाठी कलाकार मिळाल्याचे महेश कोठारेंना कळाले. त्यावेळी ते नाटकाच्या तालमी पाहण्यासाठी गेले असता बबन प्रभूंची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या कलाकाराने त्यांचे लक्ष वेधले. हा कलाकार दुसरा तिसरा कुणी न्हवता तर तो होता लक्ष्मीकांत बेर्डे!
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू उमेश यादवची मित्राकडूनच लाखो रुपयांची फसवणूक; पोलिसांकडून तपास सुरु
या पहिल्या भेटीतच महेश कोठारे लक्ष्मीकांत यांच्या प्रेमात पडले. तालमीनंतर दोघांच्या गप्पा झाल्या. यावेळी कोठारेंनी बेर्डेंना ‘प्यार किये जा’ हा सिनेमा मराठीत करत असल्याचं सांगितलं. त्यावर लक्ष्मीकांत म्हणाले “अरे व्वा झक्कास की! मी त्यात मेहमूदची भूमिका साकारतो.” त्यावर महेश म्हणाले की, “अरे मी तेच बोलायला तुझ्याकडे आलो होतो.” असं म्हटल्यावर ते दोघे खळखळून हसले. तेव्हा या दोघांनी घट्ट मिठी मारली व महेश कोठारेंच्या आयुष्यात लक्ष्मीकांत बेर्डे नावाचं पर्व सुरू झाले.
वंचित बहुजन आघाडी व शिवसेना एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्हॅलेंटाईन डे पर्यंत काहीही… “