“ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेनंतर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

"This is not the culture of Maharashtra", Ajit Pawar reacts after the slapping incident on Chandrakant Patal

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता यावर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी पोलिसांची केली तिघांना अटक

अजित पवार म्हणाले, “चंद्रकांत दादा पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेलं वक्तव्य पूर्ण चुकीचे आहे. त्याचा मी निषेधच करतो. पण त्यांनी असे वक्तव्य केले म्हणून त्यांच्यावर शाही फेकणे देखील चुकीचे आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”. अशा शब्दांमध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणारा व्यक्ती नेमका कोण?

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या भोवती अंगरक्षक असून देखील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर शाई फेकून हल्ला केलाय. चिंचवड गावामध्ये ते एका कार्यकर्त्याच्या घरी गेले असता त्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?

चंद्रकांत पाटील म्हणाले, “ पहिल्या काळात शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीदेखील महापुरुषांनी शाळा उघडल्या. पण, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहत आहेत. त्याकाळी महापुरुषांना सरकारनं शाळा सुरु करण्यासाठी अनुदान दिले नाही, त्यांनी लोकांकडं भीक मागितली”.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *