मुंबई : राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘भारत जोडो’ (Bharat jodo yatra) यात्रेचा आज सहावा दिवस आहे. यात्रेचा प्रवास कन्याकुमारी ते कश्मिर असा आहे. दरम्यान आज सामानाच्या अग्रलेखातून काँग्रेस (congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा कश्यासाठी काढली, याचं कारण सांगण्यात आलं आहे. तसेच राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे, असं म्हणत सामनातून (Saamana Editorial) काँग्रेसच्या मोहिमेला पाठिंबा देण्यात आला आहे.
State Govt: राज्य सरकारची विशेष मोहीम! या कालावधीत होणार ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’
राहुल गांधींची ‘ भारत जोडो ‘ पदयात्रा ही नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ , ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा सुरू केली आहे.तसेच देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी केली. यातून मार्ग काढण्यासाठी‘ भारत जोडो ‘ यात्रा (Bharat Jodo Yatra) अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे. राहुल गांधी वरील टीका ही भाजपास मात्र उघडे पाडीत आहे. कारण राहूल गांधींनी पाच हजाराचे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय , फरक पडत नाही.तसेच टी शर्टची किंमत 41 हजार रुपये असल्याची माहिती भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार? ‘ कर्तव्यपथा ‘ वरील पोटदुखीने भाजपला काय साध्य होणार!”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
Vijay Deverakonda: ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर विजय देवरकोंडा पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल…”
एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून राजकीय पोटदुखी ही जन्मास येते.दरम्यान पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांमधून बाहेर पडतात.आणि आता भाजप प्रवक्त्यांनी असेच किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे.असा घणाघात सामनातून भाजपावर करण्यात आला आहे.
मोठी बातमी! लम्पी आजारामुळे जनावरे दगावल्यास शेतकऱ्यांना मिळणार मदत