Priyanka Chopra: जेव्हा प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसत होता निक जोनस, फोटो सोशल मीडियावर झाला व्हायरल

This is what Nick Jonas looked like when Priyanka Chopra became Miss World, the photo went viral on social media

मुंबई : प्रियंका चोप्रा ही एक सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि गायक आहे. भारतीय अभिनेत्रींपैकी सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रियंका चोप्राचे नाव येतं. आपल्या अभिनय कारकिर्दीत प्रियंका चोप्राने दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पाच फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 2000 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा (Miss World) किताब पटकावला.

भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागांची होणार भरती, असा करा अर्ज

प्रियंका चोप्राला 2016 मध्ये भारताने सरकारने पद्मश्री (Padma Shri Award) देऊन सन्मानित केलं.तर फोर्ब्सने (forbes magazine) तिचा जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता.2000 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने मिस वर्ल्डचा (Miss World) किताब पटकावला. यानंतर प्रियंका चोप्रासाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडले आणि मग तिने मागे वळून पाहिलं नाही. बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंकाने अनेक हिट चित्रपट दिले.

Shambhuraj Desai: मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्यातील लम्पी प्रादुर्भावाचा घेतला आढावा, म्हणाले…

प्रियंका चोप्र आणि निकचं लग्न

प्रियंका चोप्रा प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनसबरोबर (Nick Jonas) विवाहबद्ध झाली. निक म्हणजेच निकोलस जेरी जोनस एक अमेरिकन गायक, लेखक, अभिनेता आहे. जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर निक आणि प्रियांकाने 2018 साली जोधपूरमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही रितीरिवाजानुसार एकमेकांशी लग्न केलं.

Ajit Pawar: “महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जाणे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे” – अजित पवार

प्रियंका मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस किती वर्षांचा होता?

निक जोनस प्रियंका चोप्रापेक्षा तब्बल 11 वर्षांनी लहान आहे. प्रियंका चोप्रा आता 39 वर्षांची आहे तर निक 28 वर्षांचा आहे. म्हणजे 2000 साली प्रियंका जेव्हा मिस वर्ल्ड झाली तेव्हा निक जोनस केवळ 8 वर्षांचा होता.सोशल मीडियार सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. निक जोनसचा हा लहानपणीचा फोटो आहे.वयाच्या सातव्या वर्षांपासून त्याने अभिनय करायला सुरुवात केली. जेव्हा प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड बनली. त्याच वर्षींचा म्हणजे 2000 सालचा हा फोटो आहे.

नीकचा हा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका युजर्सने लिहिलंय ‘तेव्हा कोणाला अंदाजही नव्हता की हा मुलगा एक दिवस मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करेल’. जानेवारीमध्ये प्रियंका आणि निक आई-बाबा झाले. प्रियंका आणि नकने आपल्या मुलीचे खूपच हटके नाव ठेवलं आहे. प्रियंका आणि निकने आपल्या मुलीचे नाव ‘मालती मेरी चोप्रा जोनास’ (Malti Marie Chopra Jonas) असं ठेवलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *