!['This' leader took advantage of Supriya Sule's naivety! Cheated by lying](http://elokhit.com/wp-content/uploads/2022/09/Supriya-Sule-1024x538.jpg)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) कायम चर्चेत असतात. दरम्यान नुकत्याच झालेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन ‘उल्लू’ बनवणाऱ्या एका नेत्याबद्दल सांगितले आहे. ‘महाविकास आघाडीच्या आधी भाजपची सत्ता असताना राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्याने माझ्या भोळेपणाचा फायदा घेऊन खोटे सांगून पक्ष सोडला. नंतर माहिती घेतली असता, त्या नेत्याने आपला गैरफायदा घेतल्याचे लक्षात आले.’ असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान सुप्रिया सुळेंना फसवणारा तो नेता कोण याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील रस्ता आज बंद
तुम्हाला आयुष्यात कोणी धोका दिल्याची भावना कधी झाली का? असा प्रश्न मुलाखती दरम्यान सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळेंनी हे उत्तर दिलं आहे. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राष्ट्रवादीचा एक नेता व त्याचे वडिल अनेक वर्षे राजकारणात होता. अचानक तो नेता राष्ट्रवादी सोडून जाणार असल्याची माहिती मला मिळाली. त्यावेळी मी त्याला फोन केला आणि त्याबद्दल विचारलं. त्यावर तो म्हणाला की, मला अशा-अशा अडचणी येत आहेत. मग मी त्यावर म्हणाले की, तुम्ही घरी या. तुम्हाला ज्या काही अडचणी येत असतील त्यावर विचार करू. पटलं नाही तर तुम्ही सोडून जा.”
धक्कादायक! मुलाने मुलगी पळून नेल्याने संपूर्ण कुटुंबानेच केली आत्महत्या
नंतर तो नेता घरी आला त्याने सुप्रिया सुळेंना खोट्या केसबद्दल माहिती दिली. यामध्ये त्याने पक्षांतर नाही केले तर पुढच्या दहा दिवसांत मला व माझ्या वडिलांना जेलमध्ये जावे लागेल, असे सांगितले. मात्र, चौकशी केल्यानंतर तो नेता खोटे बोलून आपली फसवणूक करून गेल्याची माहिती सुप्रिया सुळेंना मिळाली. त्यांच्यासाठी हे फार वेदनादायी होते. असे सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितले आहे.
धक्कादायक! दौंड तालुक्यातील भीमा नदीमध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू