
मुंबई : आज शुक्रवारी (2 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात येणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि ज्योतिरादित्य शिंदे हे देखील येणार आहेत. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने हे सर्व मंत्री एकाच दिवशी पुण्यात येत आहेत .यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
असा असेल मंत्र्यांचा आजचा पुणे कार्यक्रम
आज दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पीएमपीच्या ई-बस डेपोचे उद्घाटन होणार आहे. दरम्यान त्यानंतर मुद्रांक भवनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता वाजता होईल. पुढे सायंकाळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन होणार आहे.
Subodh Bhave: पुणे मेट्रो संदर्भात केलेली सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत
तसेच नितीन गडकरी चांदणी चौकाची पाहणी करणार आहेत. महत्वाचं म्हणजे या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच सिंबायोसिस संस्थेच्या वतीने फेस्टिव्हल थिंकर्स हा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरम्यान या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज़्योतिरादित्य सिंधिया उपस्थित राहणार आहेत.