Aryan Khan: आर्यन खानच्या प्रेमात पडली ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

'This' Pakistani actress fell in love with Aryan Khan, shared a post on social media

मुंबई : पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली (Actress Sajal Ali) केवळ पाकिस्तानातच (pakistan) नाही तर भारतातही लोकप्रिय आहे. चित्रपटसृष्टीत तिने आपल्या अभिनयामुळे एक छाप उमटवला आहे.अभिनेत्री सजलने 2017 मध्ये ‘मॉम’ चित्रपटात (Mom Movie) श्रीदेवीसोबत (Sridevi) काम केले होते. दरम्यान यानंतर सजलची भारतात लोकप्रियता वाढली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. सजल नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Urfi Javed: डान्स क्लबमधील उर्फी जावेदचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले,”आंटी वाला डान्स”

दरम्यान नुकतच सजल अलीने सोशल मीडियावर शाहरुख खानच्या राजकुमारवरील म्हणजेच आर्यन खानवरील (Aaryan khan) प्रेम व्यक्त केले आहे. सजल अलीने आज तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर आर्यन खानचा फोटो शेअर केला आहे. महत्वाची बाब म्हणजे फोटो शेअर करण्यासोबतच सजलने त्यावर रेड हार्ट इमोजीही टाकला आहे. यामुळे जरी सजलने फोटो शेअर करताना काहीही लिहिले नसले तरी त्यावरील रेड हार्ट इमोजी पाहून काही तरी खिचडी नक्कीच शिजत आहे हे स्पष्ट होते.

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत मुलींना मिळणार ५१ हजार रुपये; असा करा अर्ज

अभिनेत्री सजलच्या ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट’ चित्रपटाचा प्रीमियर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्ये झाला आहे. त्यामुळे सजल अलीने चाहत्यांचे आभार मानले तसेच ती खूप आनंदी आहे. तसेच आर्यन खान सध्या त्याच्या एका ब्रँडच्या शूटमुळे इंटरनेटवर चर्चेत आहे. कारण आर्यन खानच्या त्या फोटोंमध्ये वडील शाहरुखसारखा दिसत आहे. तसेच लवकरच आर्यन खान एका वेब सीरिजचे दिग्दर्शन करताना दिसणार आहे.

Raj Thackeray: राज ठाकरे पुढील ५ दिवस विदर्भ दौऱ्यावर;‘असे’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *