असे अनेक लोक आहेत जे प्राण्यांवर अफाट प्रेम करत असतात. ते प्राण्यांसाठी काहीही करायला तयार असतात. सध्या एक आगीवेगळी माहिती समोर आली आहे. बेंगळुरूमधील (Bangalore) एका व्यक्तीने खास जातीचा श्वान विकत घेण्यासाठी तब्बल २० कोटी मोजले आहेत. ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? मात्र ही गोष्ट खरी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेंगळुरूमधील एका व्यक्तीने एक दुर्मिळ कॉकेशियन शेफर्ड श्वान विकत घेतला असून याची किंमत तब्बल 20 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. माहितीनुसार, श्वान विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव सतीश असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी हैदराबाद येथील एका ब्रीडरकडून हा दुर्मिळ श्वान विकत घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या श्वानाचे वय 1.5 वर्ष आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्वानाचे मालक सतीश यांनी सांगितले की, हा श्वान आकाराने खूप असून तो घरी आरामात राहतो.