मुंबई: आज (28 सप्टेंबर) टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (T20 series) पहिला सामना होणार आहे. दरम्यान सर्वांच्या नजरा पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 वर असणार आहेत. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टी-20 विश्वचषक 2022 च्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे बदल करू शकतो. यामध्ये संघाचा जादुई फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) जागी अनुभवी खेळाडूला संधी मिळू शकते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ कारणांमुळे कांद्याचा भाव 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार
हा खेळाडू घेऊ शकतो चहलची जागा
आपण पाहत आलोय की गोलंदाज युजवेंद्र चहल अलीकडच्या काळात फ्लॉप ठरला आहे. युजवेंद्र चहलला आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया मालिकेत आपली छाप सोडता आली नाही. म्हणून आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये चहलच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनला (R Ashwin) संधी मिळू शकते.
चहलची ‘ही’ खराब कामगिरी
ऑस्ट्रेलिया मालिकेत सलग प्लेंइग 11 मध्ये युझवेंद्र चहलचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान या मालिकेत युझवेंद्र चहलने 3 सामन्यात 9.12 च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. तसेच चहलला या सामन्यात फक्त 2 विकेट घेता आल्या. रोहित शर्माने चहललची ही खराब कामगिरी पाहता आर अश्विनला संधी देण्याची शकता आहे.
MPSC: एमपीएससीकडून तीन महिने आधीच 2023च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कारण…
कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज
महत्वाची बाब म्हणजे आर अश्विन 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा देखील एक भाग आहे. इतकंच नाही तर टीम इंडियासाठी आर अश्विनने 56 टी-20 सामन्यात 66 विकेट घेतल्या आहेत. तसेच आश्विन भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. म्हणून येणाऱ्या सामन्यांसाठी कर्णधार रोहीत शर्माने आर अश्विनला संघात संधी दिली तर तो संघासाठी मोलाचा खेळाडू सिध्द होऊ शकतो.
पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि रविचंद्रन अश्विन.