Site icon e लोकहित | Marathi News

Asia Cup : आशिया कपमध्ये शाहीन आफ्रिदीची जागा घेणार ‘हा’ खेळाडू ; वाचा सविस्तर

'This' player will replace Shaheen Afridi in Asia Cup; Read in detail

दिल्ली : पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Afridi) गुडघ्याच्या दुखापतीमुळे आगामी आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, शाहीनला चार ते सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दुखापतीमुळे शाहीन यापुढे टी-20 आशिया चषक आणि इंग्लंडविरुद्धची सात सामन्यांची टी-20 मालिका खेळू शकणार नाही, असे बोर्डाने म्हटले आहे.

न्यूझीलंडमध्ये तिरंगी मालिका होणार आहे तेव्हा ऑक्टोबरपर्यंत तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. गेल्या महिन्यात श्रीलंकेविरुद्ध गाले येथे झालेल्या कसोटीदरम्यान शाहीनच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

Dhananjay Munde : ईडीचा ई म्हणजे एकनाथ शिंदे आणि डी म्हणजे देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे यांचा घणाघात

दुबईत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमनेसामने येणार आहेत. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते पण आता शाहीन आणि भारतीय फलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा असल्याने शाहीन स्पर्धेतून बाहेर पडल्याने चाहते निराश झाले आहेत. याशिवाय पाकिस्तानी चाहतेही सोशल मीडियावर शाहीनच्या बदलीची चर्चा करत आहेत. अशा परिस्थितीत आशिया कपमध्ये शाहीन आफ्रिदीची जागा कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

priti zinta : डिंपल गर्ल प्रीतीने अमेरिकेत केली ‘अशी’ जन्माष्टमी साजरी, पहा व्हिडिओ

आशिया चषक स्पर्धेत शाहीनऐवजी मीर हेमझाचा समावेश व्हावा यासाठी सोशल मीडियावर क्रिकेट चाहते आग्रही आहेत. हेम्झाने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 1 कसोटी सामना खेळला असून 1 बळी घेण्यात त्याला यश आले आहे. हेमझा हा डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने पाकिस्तानी बोर्ड मोठ्या स्पर्धेत बदली म्हणून हेमझासारख्या प्रतिभावान गोलंदाजाला संधी देऊ शकेल, अशी अपेक्षा आहे.

Bhagatsinh Koshyari : राज्यपाल कोश्यारी लातूर दौऱ्यावर, दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Spread the love
Exit mobile version