मागच्या काही दिवसापासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान (Rakhi Sawant and her husband Adil Khan) त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे.
ओशिवारा पोलीसांनी ७ फेब्रुवारीला आदिलला अटक केली होती. त्यावेळी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. राखी सावंत आणि तिचे वकील यांनी आदिलच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. तेव्हा १६ फेब्रुवारीला आदिलला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आदिलला काल पुन्हा हायकोर्टात हजर करण्यात आलं.
“मूर्ख व्यक्ती सत्तेत आली की…”, संजय राऊतांच ते ट्विट चर्चेत
दरम्यान, आता आदिलविरोधात लढाई लढण्यासाठी राखीला एका राजकीय पक्षाचा पाठिंबा मिळत आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास (Ramdas Athvale) आठवले यांंनी राखीला पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाबाबत राखी सावंतने रामदास आठवले यांच्याशी चर्चा केली. यावेळी आठवले म्हणाले, “राखी सावंत सोबत माझे चांगले संबंध आहेत. ती एक चांगली अभिनेत्री आहे. आदिलनं राखीप्रमाणं इतर महिलांनादेखील फसवलं आहे. त्यामुळं आदिल खानला कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी. यासाठी राखीला रिपब्लिकन पार्टीचा (Republican Party) पाठिंबा आहे. असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
कांद्याला भाव नाही म्हणून संतापला शेतकरी, घेतलं स्वतःच तोंड झोडून; पाहा व्हिडीओ