जिओ ही स्वस्तात डाटा सेवा पुरवणारी नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी कमी काळातच जिओने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. जिओच्या वाढत्या युझर्सच्या संख्येमुळे कितीतरी मोठ्या-मोठ्या नेटवर्क कंपन्यांना आपले बस्तान गुंडाळावे लागले आहे. जिओ चे डाटा प्लॅन्स ( Jio data palns) लोकांना आकर्षित करणारे व परवडणारे आहेत. यापैकी जिओची डाटा लोन सेवा ही एक लोकप्रिय सेवा आहे.
आता महिला चालवणार राज्याचा कारभार? उद्धव ठाकरेंचं वक्तव्य चर्चेत
परंतु, काही कारणास्तव जिओ ने ही सेवा तात्पुरती बंद केली आहे. जिओकडून ही सेवा बंद का करण्यात आली याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान Jio data loan या सेवेमधून ग्राहकांना 2 GB डाटा उधार मिळत होता. अत्यावश्यक गरज असेल तेव्हा ग्राहकांना या सेवेचा फायदा मिळत होता. यासाठी त्यांना 25 रुपये मोजावे लागत होते. अचानक डाटा संपल्यानंतर बहुतेक युझर्स या सेवेचा फायदा घेत होते.
1000 इंजिनिअर्स तरुणांना मिळणार नोकरीची संधी; ‘या’ मोठ्या कंपनीने जाहीर केली भरती
जिओ कंपनीने ही सेवा बंद केल्याने ग्राहकांना नवीन डाटा रिचार्ज करावा लागतोय. याआधी उधार डाटा मिळत होता तो बंद झाल्याने नवीन रिचार्ज करण्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओ कंपनीने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र कंपनीच्या अँप वर ही सेवा तात्पुरती बंद असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातच यामुळे जिओ युजर्स चांगलेच संभ्रमात आहेत.