Site icon e लोकहित | Marathi News

तृतीयपंथीयांची भूमिका उभारण्यासाठी अभिनेत्याने उचलले ‘हे’ पाऊल; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

'This' step taken by the actor to establish the role of the third party; You will also be shocked to read!

नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीला ‘चार चांद’ लावणाऱ्यातला एक अभिनेता ! आपल्या आवाजाच्या आणि अभिनयाच्या जोरावर त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. हड्डी या चित्रपटामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी (Navajuddin Siddiaque) सध्या चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक केले जात आहे.

शेतकऱ्याचा एक लाखाचा कापूस गेला चोरीला, ‘या’ ठिकाणी घडली घटना; वाचा सविस्तर

‘हड्डी’ ( Haddi) या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी तृतीयपंथीयांच्या भूमिकेत पहायला मिळतोय. यामध्ये त्याने हिरवी साडी नेसली असून भडक रंगाची लिपस्टिक लावली आहे. तसेच कपाळावर लाल रंगाची टिकली, गळ्यात मोत्याची माळ आणि नाकातली नथ यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी भलताच उठून दिसत आहे.

‘हे’ जोडपे झाले ‘रातोरात मालामाल’! किचनच्या फरशीखाली सापडली जुनी नाणी

या चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारणार असून स्त्री व तृतीयपंथी (Transgender) या दोन्ही भूमिका तो करत आहे. यातील तृतीयपंथीयांच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकी याने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

स्टिंग मॅगीचा ‘हा’ प्रकार तुम्हाला माहित आहे का? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

ही व्यक्तिरेखा उभारण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीने काही दिवस तृतीयपंथीयांसोबत राहून त्यांना समजून घेतले. त्यांचे निरीक्षण करून ते जगाकडे कशा दृष्टिकोनातून पाहतात ? हे पाहिले. मला ती भूमिका फक्त साकारायची न्हवती तर जगायची होती. म्हणून मी तृतीयपंथीयांसोबत राहिलो असे नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी मुलाखतीत सांगितले आहे.

“…म्हणून कार्यक्रम सुरू असतानाच शरद पवार झाले भावूक”; काय झाले असेल? वाचा सविस्तर

Spread the love
Exit mobile version