
मुंबई: मागील काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendr Fadanvis) यांना तब्बल सहा जिल्ह्यांच पालकमंत्रीपद दिलं आहे. या पालकमंत्री पदावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी फडणवीस एकट्याने इतक्या जिल्ह्यांचा कारभार कसा पाहणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर फडणवीसांनीही अजितदादांना प्रत्युत्तर देताना एकावेळी अनेक जिल्ह्यांचा कारभार कसा पाहायचा, याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना देईन, असा टोला लगावला. याच टोल्याची अजित पवारांनी शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्याजासकट परतफेड केली आहे.
शेतकऱ्यांसमोर नव संकट! ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर पडला खतांचा तुटवडा
काय म्हणाले आजित पवार?
मी देवेंद्र फडणवीस यांना विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधी येऊ, त्यासाठी किती फी लागेल? फडणवीस मला ही ट्रेनिंग मोफत देणार आहेत? त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली.
पुढे अजित पवार म्हणाले की, पालकमंत्री असताना फक्त पुणे जिल्हा माझ्याकडे होता तर नाकी नऊ यायचं… पण फडणवीसांकडे तर सहा जिल्हे दिलेत. हे कसं काय जमतं यांना…
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकऱ्यांना दिलासा, वटाण्याला तब्बल 15 हजारांचा मिळाला कमाल भाव
फडणवीस काय म्हणाले होते?
अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही सहा जिल्हे कस काय सांभाळणार अशी टीका केली होती. या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनीही खोचक टोला लगावला. फडणवीस म्हणाले की, ‘ मी गुरुमंत्र देतो… कधी त्यांचं राज्य आलंच तर दोन-तीन-चार जिल्हे कसे मॅनेज करायचे हे शिकवेन. हे सहा जिल्हे नियोजन मंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय, त्यामुळे सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात? असा सवाल फडणवीसांनी केला.