दिल्लीमध्ये गुन्हे घडण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दिल्लीतील अमानुष हत्या (Delhi Murder Case) प्रकरणाबद्दल आणखी एक माहिती समोर आली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची चाकूने हत्या करण्यात आली होती. त्या अल्पवयीन मुलीची हत्या करणारा साहिल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे अशी माहिती समोर आली आहे. साहिल हा आधीपासूनच मारहाण करण्याच्या प्रकरणांमध्ये सापडला होता. तो राहतो त्या परिसरातील मुलांना मारहाण केल्याप्रकरणी त्याच्यावरती पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या पोलीस त्याच्या इतर गुन्ह्यांची चौकशी करत आहेत.
काळ्या रंगाच्या सफरचंदाची किंमत वाचून व्हाल थक्क ; वाचा सविस्तर
साहिल अल्पवयीन असताना त्याने एका तरुणावर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे साहिलची खच्चून चौकशी चालू आहे. साहिलने याआधी केलेल्या कृत्यांची पोलीस माहिती घेत आहेत. एका स्थानिक टोळीशी साहिल संबंधित आहे, अशी पोलिसांना शंका आहे. माहितीनुसार, साहिलचे दोन वर्षांपूर्वी शाहबाद डेअरी भागामध्ये जे जे कॉलनीमध्ये एका तरुणांसोबत भांडण झालेले होते. साहिलने मारहाण केलेल्या त्या मुलाच्या डोक्यात 14 टाके पडले होते. यासंदर्भात पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली होती. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करत कमी शिक्षेच्या कलमांसहित गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर साहिल त्याच्या कुटुंबाबरोबर जैन कॉलनीत राहायला गेला. माहितीनुसार, श्रीकृष्ण ग्रुप जो की त्या परिसरामध्ये दहशत पसरवतो त्याच्याशी साहिल संबंधित आहे. साहिलने याच भागात अल्पवयात एका तरुणावर गोळी झाडली होती. परंतु पोलिसांनी त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्याच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नव्हता.
Crime | १६ वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या; ९० सेकंदात केला खेळ खल्लास
दरम्यानच, सोशल मीडियावर साहिलचा एक फोटो व्हायरल होतंय. त्या फोटोमध्ये साहिल ने हातात दोरा घातला आहे. त्याने तो दोरा का घातला आहे? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्या संदर्भात एक मोठा खुलासा समोर आलायं. साहिलची आई सतत आजारी असते तिच्या मनःशांतीसाठी त्यांनी तो दोरा आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली आहे. अशी साहिलने माहिती दिली आहे. पण पोलिसांना त्याच्यावरती विश्वास नसून, त्याच्यावरती पोलिसांना शंका आहे. त्याच्या या जबाबाची पोलीस पडताळणी करणार आहेत.
Marriage | इथं एकीचेच असतात वांदे! पण ‘हा’ गडी संभाळतो ९ बायका