येत्या 15 ऑक्टोबरपासून ऊसाचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing) सुरु होणार आहे. या गाळप हांगमाबाबतचे तसे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड (shekhar gaykwad) यांनी दिले आहेत. खरतर 1 ऑक्टोबरला ऊसाचा गाळप हंगाम सुरु होणार होता. म्हणून आपापल्या गावावरून ऊसतोड मजूर कारखान्यावर (factory) दाखल झाले आहेत. परंतु ऊसतोड मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच कारण म्हणजे गाळप हंगाम पुढे ढकलला गेला आहे. सध्या राज्यातील ऊसतोड मजुरांच्या (Workers) हाताला काम नाही. यामुळे मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील ऊसतोड मजूर टोळ्यांनी कारखान्यावर ठाण मांडलं आहे. जे साखर कारखाने 15 ऑक्टोबरच्या आधी सुरु करतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे (Criminal offences) दाखल होणार असल्याचे साखर आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
Abdu Rojik: काय सांगता! अब्दु रोजिक आहे ‘एवढ्या’ संपत्तीचा मालक; वाचा सविस्तर
25 सप्टेंबरपासून मजूर कारखान्यावर दाखल
ऊस तोड कामगारांनी सांगितले की, आम्हाला मालक 1 ऑक्टोबरला कारखाना सुरु होणार म्हणून घेऊन आला आहे. परंतु इथं आणल्यावर आम्हाला सांगितले की कारखाना 15 ऑक्टोबरला सुरु होणार आहे. मालकाने आम्हाला खोट बोलून याठिकाणी आणलं त्यामुळं आता आमच्या हाताला काम नाहीच पण त्यामुळं लेबरच्या खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती ऊसतोड मजुराने दिली आहे. मालकाने जर आधीच सांगितले असते तर दसरा झाल्यावर आम्ही आलो असतो. आता आमच्याकडे खाण्यासाठी देखील पैसे नाहीत असे ऊसतोड कामगारांनी सांगितलं.
Suraj Pawar: सैराट फेम प्रिन्स पून्हा चर्चेत; फसवणूक प्रकरणावर केलीली फेसबुक पोस्ट व्हायरल
त्या कारखान्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करणार
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी 1 ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरू होईल असं सांगितलं होतं. दरम्यान आता 15 ऑक्टोबरच्या आत जे कारखाने सुरु होतील त्या कारखान्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचे साखर आयुक्तांनी परिपत्रकात सांगितले आहे. शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते यांनी साखर आयुक्तांनी गाळप हंगाम कोणाच्या संगण्यावरुन पुढे ढकलला असा सवाल केला आहे. तसेच रायते यांनी साखर आयुक्तांना फौजदारी गुन्हे दाखल करायचे आहेत ते गुन्हे ज्या कारखान्यांनी FRP दिली नाही त्यांच्यावर करा अशी मागणी केली आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी गाळप हंगामात 14.84 लाख हेक्टर एवढं क्षेत्र ऊस लागवडीखाली आहे. त्यामुळं यंदाही अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.