पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Sanman Nidhi Yojana) हफ्ता मागील काही दिवसांपासून अडकला होता. त्यामुळे या योजनेवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आज सोमवारी (17 ऑक्टोबर ) दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या पीएम किसान सन्मान 2022 मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12वा हप्ता (12th installment) जाहीर केला आहे.
धक्कादायक घटना! दौंडमध्ये घरफोडून १० लाख ७२ हजारांसह दागिने लंपास
बाराव्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये (farmers) आनंदाचे वातावरण आहे. लोक त्यांची खाती तपासत आहेत. दरम्यान देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपयांचा हफ्ता पाठवला आहे. यावेळी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यासाठी 16,000 कोटी रुपये खर्च केले असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात निघाल्या आळ्या, परिसरात उडाली खळबळ
तसेच पंतप्रधान मोदींनी (Pm modi) रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत किसान समृद्धीच्या 600 केंद्रांचे उद्घाटन देखील करण्यात आले. दरम्यान यावेळी मोदींनी कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी युवक आणि कृषी शास्त्रज्ञांनाही विकासाचा मंत्र दिला आहे. तसेच आज नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे ही परिषद दोन दिवस चालणार आहे. या परिषदेत शेतकरी, कृषी क्षेत्रात काम करणारे युवक, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
मोठी बातमी! जिल्हा परिषदेच्या २८७ शाळा बंद होण्याच्या मार्गावर? राज्य सरकारने घेतला निर्णय
तसेच या कार्यक्रमात देशभरातील 13,500 हून अधिक शेतकरी आणि सुमारे 1500 कृषी स्टार्टअप्स एका व्यासपीठावर एकत्र येणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेत भारतीय जनता खत प्रकल्प, वन नेशन वन फर्टिलायझरचाही शुभारंभही करण्यात आला आहे. दरम्यान या योजनेंतर्गत प्रधानमंत्री भारत योजनेखाली युरियाही लाँच करण्यात आल्या. म्हणून भारतभर आता एकाच ब्रँडखाली खतांची विक्री केली जाणार आहे.
दिवाळीनिमित्त भारतीयांसाठी इंस्टाग्रामची खास ऑफर, रील्स बनवा अन्…; पाहा नेमकी काय आहे ऑफर?