स्वाभिमानीचे ठिय्या आंदोलन; नुकसान भरपाई न देणाऱ्या विमा कंपन्यांवर करावाई करण्याची मागणी

Thiya movement of self-respect; Demand action against non-compensating insurance companies

राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यावेळी सरकारने देखील लवकर नुकसान भरपाई जाहीर केली नाही. तसेच विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. नुकसानीच्या तुलनेत अगदीच कमी रक्कम विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. इतकचं नाही तर अजूनही काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेलीच नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ( Swabhimani Shetkari Sanghtna) विदर्भात आंदोलन करण्यात आले.

Nilesh Lanke: आमदार निलेश लंकेची तब्बेत खालावली

या कठीण काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरसावली आहे. या संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली संतापलेल्या शेतकऱ्यांनी नुकतेच तालुका कृषी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावर्षी झालेल्या अत्यंत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम भरली असतांना भरपाई देतांना विमा कंपनीने खूप कमी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिली आहे. यामुळे शेतकरी संतापात होते.

विरोधी पक्षनेते अजित पवार आज श्रीगोंदा दौऱ्यावर; ‘असा’ असेल दौरा

या आंदोलनादरम्यान सर्व शेतकऱ्यांना 100% पिक विमा भरपाई द्या व शेतकऱ्यांच्या विमा रकमेवर दरोडा टाकणाऱ्या विमा कंपनीवर कारवाई करा. अशी मागणी शेतकऱ्यांकडून तालुका कृषी कार्यालयात करण्यात आली. असे न झाल्यास संघर्ष अटळ आहे. असा इशारा देखील यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

“…अन् त्या लहान मुलाचा जागीच मृत्यु झाला”; वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे घडला धक्कादायक प्रकार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *