आजकाल महिलांच्या असुरक्षिततेबाबत भरपूर घटना घडत आहेत. स्वतःच्याच राज्यात आणि देशात त्या सुरक्षित नाहीत. त्यामुळे ‘कुंपणच शेत खायला लागलं तर विश्वास कोणावर ठेवायचा’ अशी परिस्थिती महिलांच्या बाबतीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. इथून पुढे राज्यात कोणत्याही चौकात अथवा रस्त्यावर मुलींसोबत खोडसाळपणा केला किंवा छेडछाड केली तर तिथून पळून जाण्यापूर्वीच अगदी पुढच्याच चौकात त्या गुन्हेगाराला पोलीस बेड्या ठोकतील असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
शाईफेक प्रकरणावर राजू शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
एका कार्यक्रमानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) शुक्रवारी कानपूरमध्ये होते. यावेळी त्यांनी 387.59 कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन व पायाभरणी केली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी शासनाची धोरणे व योजनांची माहिती दिली. “केंद्र आणि राज्य सरकार राज्याच्या विकासासाठी कटिबद्धतेने काम करत असून राज्यातील मुली आणि महिलांच्या सुरक्षेबाबतही आम्ही प्रयत्नशील आहोत.” असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
बिग ब्रेकिंग! शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेल्या पत्रकाराची सुटका
उत्तरप्रदेशमध्ये ( UP) कुठल्याही चौकात कोणी खोडसाळपणा केला किंवा छेडछाड केली तर तो पळून जाण्यापूर्वी पुढच्याच चौकात पोलीस त्याला बेड्या ठोकतील. यावेळी चौकाचौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गुन्हेगाराचे छायाचित्र कैद होतील, यामुळे पोलिसांना गुन्हेगार शोधने सोप्पे जाणार आहे. अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. यूपी सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे.
राज्यात अवकाळी पाऊसाची शक्यता; हवामान खात्याकडून देण्यात आल्या ‘या’ सूचना