
Maharashtra Politics । मुंबई : निवडणुकांना (Loksabha Election) काही दिवसाचा अवधी बाकी आहे. सध्या राज्यात शिंदे-पवार-फडणवीस सरकार आहे. या सरकारला आणि खास करून भाजपाला (BJP) सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागते. राज्यात निवडणूक यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे प्रशिक्षण देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले. (Latest Marathi News)
Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा
त्यावेळी फडणवीसांनी महायुतीतील बॉस सांगितला. “शिवसेना आणि राष्ट्रवादी (NCP) आली तरी राज्यात भाजपच बॉस असणार. कारण युतीमधील सर्व पक्षांमध्ये समन्वय साधत उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे. सर्वात अगोदर पक्ष आणि सगळ्यात शेवटी मी आहे, आज मी या ठिकाणी उभा आहे तो फक्त पक्षामुळेच. जर मी पक्ष सोडून उभा राहिलो तर माझ डिपॉझिट जप्त होईल,” असे फडणवीस म्हणाले आहेत.
“स्वत:साठी 10 तास आणि पक्षासाठी 14 तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील प्रभावित व्यक्तींशी संपर्क साधा. पुढील एका वर्षाचा रोडमॅप तयार करा. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सगळ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा,” असे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दादर येथे भाजप लोकसभा आणि विस्तारकांच्या बैठकीत ते बोलत होते.
Rohit Patil । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! रोहित पाटील यांची बिघडली तब्येत, डॉक्टरांचं पथक दाखल