
मुंबई : महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये लम्पी (lumpy) आजाराचा प्रभाव पाहायला मिळत आहे. दरम्यान वाशिम (Washim)जिल्ह्यातील वाकद परिसरात अनेक जनावरांना (animals) लम्पी आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे आजाराची लागण झालेल्या जनावरांना आणि इतर जनावरांना वेगळे ठेवावे लागत आहे. दरम्यान या आजारामुळे वाकद परिसरात शेतकरी (farmer) श्रीराम देशमुख यांच्या एका बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
तसेच शेतकऱ्यांकडून पशु संवर्धन विभागाकडे लम्पी या रोगावर प्रभावी उपाययोजना करून पशुपालकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विनोद वानखेडे यांनी गोठ्यात आणि जनावरे स्वच्छ ठेवण्याचे आव्हान केले आहे. यासोबतच पशुसंवर्धन विभाग उपाययोजनांसाठी तत्पर आहे, त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये असेही डॉ. विनोद वानखेडे यांनी म्हंटले आहे.
Anushka Sharma: अफगाणिस्तानविरुद्ध विराटची शतकी खेळी, पत्नी अनुष्काने केली भावूक पोस्ट; म्हणाली…
महत्वाचं म्हणजे लम्पी आजारासाठी आवश्यक लसीकरणाचे औषध उशिरा पोहचलं आहे. त्यामुळं लम्पी आजार वाढण्याचा धोका निर्माण झालाय. म्हणून राज्यातील पशुवैद्यक सतर्क झाले असून संपूर्ण राज्यात लसीकरण करण्यात येतंय. उत्तर प्रदेशात लम्पी या आजारानं 115 जनावरं दगावली आहेत. तर 17 लाख जनावरांचं लसीकरण करण्यात आलं.