Yogi Adityanath । मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडत आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना धमकी दिली. ही घटना ताजी असताना आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. (Threat to CM Yogi Adityanath)
Crime News । धक्कादायक! सलमान खानवर चाकूने हल्ला, पोलिसांकडून चौघांना अटक
पोलिस नियंत्रण कक्षाच्या सीयूजी क्रमांकावर हा कॉल आला आणि हा फोन हेड कॉन्स्टेबलने घेतला होता. योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवले जाईल, असे कॉलरने कॉन्स्टेबलला सांगितले. त्यानंतर कॉन्स्टेबलने विचारले असता तुम्ही कुठून बोलत आहात? त्यावेळी कॉलरने लगेचच कॉल डिस्कनेक्ट केला. सुरक्षा मुख्यालयात तैनात हेड कॉन्स्टेबल उधम सिंग यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. (Latest marathi news)
या संपूर्ण प्रकरणानंतर एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलीस आणि यंत्रणांनी या तपास सुरू केला आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी चार पथके तैनात केली आहेत. सव्र्हेलन्स सेलच्या मदतीने धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल ट्रेस करण्यात येत आहे. योगी यांना यापूर्वीही धमक्या आल्या असल्याने सध्या या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे.