‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ( Tarak Mehta Ka Ulta Chashma) ही मालिका छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर करून ठेवले आहे. मागील 14 वर्षांपासून या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. दरम्यान या मालिकेतील कलाकाराबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
मोठी बातमी! सोनिया गांधींची प्रकृती खालवली, रुग्णालयामध्ये दाखल
या मालिकेत काम करणारे अभिनेते दिलीप जोशी ( Dilip Joshi) म्हणजे सर्वांचे आवडते कलाकार जेठालाल यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. एका अज्ञात व्यक्तीने नागपूर कंट्रोल रूमला कॉल करून दिलीप जोशी यांना धोका असल्याचे सांगितले. या व्यक्तीने जोशी यांच्या घराबाहेर 25 लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली.
धक्कादायक! भिंत तोडून मध्यरात्री दोन तरुण शिरले शाहरुख खानच्या घरामध्ये
याआधी देखील अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्या घरात बॉम्ब ठेवला असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीने दिली होती. यावेळी या कलाकारांसाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी तपास केला असता अज्ञातांनी दिलेली धमकी फसवी असल्याचे समोर आले आहे.