इंदापूर : शॉटसर्किटमुळे अनेक ठिकाणी आग लागल्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. अशीच एक घटना इंदापूर (Indapur) तालुक्यामध्ये घडली आहे, इंदापूर तालुक्यात शॉटसर्किटमुळे शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Prathamesh Parab: ‘टाईमपास’ फेम दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू; पाहा PHOTO
माहितीनुसार, शेतामध्ये असेलेल्या रोहित्राला विजपुरवठा करणाऱ्या खांबावर गुरूवारी दुपारी साडेबारा च्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट झाल्याने ऊसाला आग लागली. यामध्ये ३ एकर ऊस जळाला आहे. तेथील ग्रामस्थाने व अग्निशमन दलाने आग विझवल्यामुळे राहिलेला ऊस वाचला. जवळपास दोन लाखांपर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
महिला आणि पुरुष क्रिकेटर्सना मिळणार समान मानधन, जय शाह यांची घोषणा
जळीत ऊसाचा कारखाना विभागाने लवकरात लवकर पंचनामा करावा आणि प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘या’ योजेनंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० लाख रुपये अनुदान