शिरूर (Shirur) तालुक्यात दोन पेट्रोल पंपावर दहशत माजवत दरोडा टाकून तब्बल दीड लाख रुपये लुटणाऱ्या दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामधील तीन तरुण श्रीगोंदा (Srigonda) तालुक्यातील आहेत.
बिग ब्रेकिंग! अभिनेत्री तबस्सुम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
शिरूर तालुक्यातील एका पेट्रोलपंपावर १२ नोव्हेंबरला या चौघांनी पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून जवळपास 49 हजार रोख रक्कम आणि एक मोबाईल फोन चोरी गेला. नंतर परत १२ नोव्हेंबरला शिरूर तालुक्यातील आयओका पेट्रोलीयम या एच.पी. कंपनीच्या पेट्रोलपंपावर सहा इसमांनी दुचाकीवरून येत तेथील कामगारांना कोयत्याने दाखवत जवळपास एक लाख रॉक रक्कम, मोबाईल फोन व पाकीट असा माल दरोडा टाकून लंपास केला होता. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एका व्यक्तीला ऑनलाईन हॉटेल बुक करण पडलं महागात; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?
आता या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली. या आरोपींना पोलिसांनी माहिती विचारताच त्यांनी न्हावरा येथील पेट्रोलपंपावरील गुन्हा केल्याचे देखील कबूल केले.
अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न