डॉक्टरांना आपल्याकडे देव मानले जात. कारण की डॉक्टर आपल्याला योग्य तो उपचार करून आपल्याला जीवनदान देत असतात. मात्र सध्या एक धक्कादायक घटना घडली आहे जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. डॉक्टरांच्या मारहाणीमुळे साताऱ्याच्या (Satara News) कोरेगाव तालुक्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सलमान खान अडकणार लग्नबंधनात? भर गर्दीत महिलेने घातली लग्नाची मागणी, व्हिडिओही झाला व्हायरल
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव शशिकांत असे आहे. हा तरुण एका हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्या खात्यावर डॉक्टरांनी कर वाचवण्यासाठी 6 लाख 10 हजार रुपये पाठवले होते. त्याचबरोबर जबरदस्तीने घराची नोटरी करून घेत डॉक्टरांनी नावावर करून घेतले होते. यावेळी डॉक्टरांनी तरुणाला बेदम मारहाण देखील केली. या मारहाणीला आणि दबावला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
तरुणाने आत्महत्या करण्याअगोदर एक चिट्ठी लिहून हा सर्व प्रकार सांगितला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात डॉक्टर सुहास चव्हाण, डॉ गणेश होळ आणि गोपाळ साळुंखे यांना अटक करण्याची मागणी शशिकांतच्या कुटुंबियांनी केली आहे. शशिकांतच्या आत्महत्येने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे आरोपी डॉक्टरांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी शशिकांतच्या कुटुंबीयांनी केली आहे.
हार्दिक पांड्यावर टीम इंडियाची जबाबदारी? आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना मिळणार संधी