Nanded News । नांदेड : नुकतेच जड अंतःकरणाने सर्वांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. लोक ज्या उत्साहाने बाप्पाला घरी आणतात, त्याच उत्साहाने ते त्याचे विसर्जन करतात. एकीकडे विसर्जनाची (Visarjan Accident) धामधूम सुरू होती तर दुसरीकडे एक अतिशय वाईट घटना समोर आली आहे. काल तीन शाळकरी विद्यार्थी तलावावर फिरायला गेले होते. परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
Health Tips । सावधान! अंड्यासोबत काय खावं आणि काय खाऊ नये? वेळेपूर्वीच जाणून घ्या, नाहीतर..
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी गावातील ही घटना आहे. देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) आणि वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) अशी त्या मुलांची नावे आहेत. पाझर तलावात या मुलांचा मृत्यू झाला आहे. यात दोन सख्ख्या भावंडांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
हे तिन्ही विद्यार्थी तलावात पोहोण्यासाठी गेली होती. परंतु या तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तातडीने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दरम्यान, देवानंद आणि बालाजी हे दोघे सख्खे भाऊ होते आणि वैभव हा एकुलता एक मुलगा होता.
Manipur । पुन्हा हिंसाचाराचा भडका! संतप्त जमावाकडून मुख्यमंत्र्यांचं घर पेटवण्याचा प्रयत्न