Site icon e लोकहित | Marathi News

Car Accident । धक्कादायक! जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारने तिघांना चिरडले, एक जण गंभीर जखमी

Car Accident

Car Accident । मागील काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक उपाय करूनही अपघात कमी होत नाहीत. दररोज कुठे ना कुठे अपघात घडल्याच्या घटना (Accident news) आपल्याला ऐकायला मिळतात. अपघातांमुळे कुटुंबे उध्वस्त होतात. सध्या असाच एक भीषण अपघात घडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या भरधाव कारनं तिघांना चिरडलं आहे. (Latest Marathi News)

Pune Accident । ताबा सुटल्याने भरधाव टेम्पोनं अनेकांना चिरडलं, सात जण गंभीर जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मधेपुरा जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीणा यांच्या कारने अपघात केला आहे. ही कार कार पाटणा येथून मधेपुराला चालली होती. ही कार खूप वेगात होती. ती मधुबनीतील फुलपारस पोलीस स्टेशन परिसरात येताच समोरून येणाऱ्या एका वाहनाला धडक (Car Accident News) दिली. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

कारची धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातानंतर घटनास्थळीचे दृश्य भयानक झाले होते. उपस्थितांनी गाडीची मोडतोड केली. नागरिकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कारमध्ये असल्याचा दावा केला आहे. परंतु, पोलिसांनी जिल्हाधिकारी कारमध्ये नसल्याचा दावा केला आहे.

Palghar Accident । पुलाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांची बोट बुडाली! २१ कामगार बचावले तर २ बेपत्ता

अपघात झाल्यानंतर एक दुचाकी घटनस्थळी आली आणि त्यांनी जिल्हाधिकारी, ड्रायव्हर, एक अंगरक्षक आणि एका मुलीला घेऊन गेली, असे उपस्थितांनी सांगितले. उपस्थितांनी काही वेळ जोरदार घोषणाबाजीही केली. दरम्यान, वातावरण तापल्याने घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

Farmer Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! साडे सहा एकर जमिनीतून पपई आणि टरबूज विकून कमावले 42 लाख रुपये; असं केलं नियोजन?

Spread the love
Exit mobile version