Mumbai News । दारू पिऊन महिलांचा राडा, पोलीस अधिकाऱ्याच्या मनगटाच्या चावा घेत केली शिवीगाळ

Mumbai News

Mumbai News । विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विरार पश्चिम येथील गोकुळ टाऊनशिपमधील एका बारमध्ये तीन महिलांनी पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करून चावा घेतल्याचा आरोप आहे. या तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार, किरकोळ कारणावरून २० जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर केला हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरारमधील एका रेस्टॉरंट बारमध्ये तीन महिला दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर महिला पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी, इतर पोलीस अधिकारी आणि हवालदार घटनास्थळी दाखल झाले. मात्र त्या महिलांनी पोलिसांशीही गैरवर्तन केले. एवढेच नाही तर एका महिलेने पोलिस अधिकाऱ्याचा गणवेश हिसकावून त्याला ओढले.

Supriya Sule । शरद पवारांच्या ‘काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या..

या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Eknath Shinde । पक्ष विलिनीकरणाच्या शरद पवारांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Spread the love