
दौंड-पाटस (Daund-Patas) रोडवर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उसाच्या ट्रॉलीला धडकून दुचाकीवरील तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. मृत तरूण नगर जिल्ह्यातील काष्टी येथील रहिवाशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर मधील सांस्कृतिक महोत्सवात अल्लू अर्जुन राहणार उपस्थित; नितीन गडकरी यांनी दिली माहिती
हे तिघे तरुण जेवणासाठी रात्री दौंड-पाटस रस्त्यावर आले होते. नंतर जेवण झाल्यानंतर दौंडच्या दिशेने येत असताना क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरलेल्या ट्रॅक्टर – ट्रॅालीला पाठीमागून जोरात धडकले. व दुर्दैवी त्या तरुणांचा मृत्यू झाला.
मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय! वर्षात मिळणार लाखोंचा परतावा
अपघातानंतर लगेचच त्यांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने तेथील परिसरात खळबळ उडाली आहे.