कुस्ती ही महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे. पुण्यात ( Pune) आजपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू होणार आहेत. मोठ्या व मानाच्या कुस्ती स्पर्धांपैक एक स्पर्धा म्हणून ‘महाराष्ट्र केसरी’ ची ओळख आहे. 10 ते 14 जानेवारीपर्यंत हा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा भरणार आहे. आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व ऑलम्पिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
रोहित पवारांची निवड परंपरेला नुकसान करणारी – राम शिंदे
कोथरूड मधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी मध्ये ही स्पर्धा होणार आहे. यासाठी 32 एकर जागेत व्यवस्था केली असून आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचे देखील नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या 65 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेमध्ये राज्यातील 45 तालीम संघातील 900 पेक्षा अधिक पैलवान स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यामध्ये विविध 18 वजनी गटांचा समावेश आहे.
Rohit Sharma: रोहित शर्मानं टी20 क्रिकेट सोडायचा निर्णय घेतला?
यंदाच्या महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari 2023) स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. तसेच उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना ‘येजडी जावा’ ही मोटारसायकल आणि रोख बक्षीस दिले जाणार आहे. ‘महाराष्ट्र केसरी’चे प्रमुख संयोजक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
एक लाख रुपये भरून जामीन मिळाला मात्र कोचर दाम्पत्याची आजची रात्र कारागारगृहातच
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ( दि. 14) सायंकाळी ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला गौरवण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघांचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांची उपस्थित असणार आहे.