Site icon e लोकहित | Marathi News

थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला

थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला; पाहा VIDEO

सातारा : आपण अनेकदा पुराच्या पाण्याच्या (flood water) प्रवाहात गाड्या वाहून जाण्याच्या घटना पाहतो. दरम्यान आता तर अशी घटना घडली आहे की, चक्क पुराच्या पाण्यात संपूर्ण कारसह कारमधील दोघा जणांवरही काळानं घाला घातला आहे. सातारा (Satara) जिल्ह्यात मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. काल सगळीकडेच धो-धो पावसाने धुमाकूळ घातला.

दुर्दैवी! हेलिकॉप्टर कोसळून 6 जणांचा जागीच मृत्यू; वाचा सविस्तर

दरम्यान साताऱ्यात देखील या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरुन वाहून लागले होते. यावेळी सोमंथळी-सस्तेवाडी दरम्यान कारमधून जात असताना मुलगी आणि वडिलांवर (father and daughter) काळानं घाला घातला. पुराच्या पाण्यात कारसह मुलगी आणि वडील दोघेही बुडाले. या कारमध्ये अडकलेले वडील आणि मुलगी जिवंत बाहेर येऊ शकले नाही. दरम्यान या थरारक घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

Om Puri: ‘इंटिमेट’ सीन देताना ओम पूरीचा ताबा सुटला, आणि…

छगन मदने आणि प्रांजल मदने अशी कारमधील दोघांची नावं होती. मदने यांची ईर्टिगा कार पुराच्या पाण्यात अडकली. संपूर्ण कार पाण्यात गेल्यामुळे छगन आणि प्रांजल यांच्या नाकातोंडात पाणी गेलं. पाण्यात गुदमरल्याने त्यांना श्वास घेण्यात अडचणी आल्या. या दुर्दैवी घटनेत छगन आणि प्रांजल या बापलेकीचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त केली जातेय. त्यांच्या मृत्यूमुळे मदने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

अबब! चक्क कोंबडीनं दिलं देशातील सर्वात मोठं अंड, अंड्याचे वजन ऐकून बसेल धक्का

Spread the love
Exit mobile version