इंदापूर तालुक्याचे दमदार लोकप्रिय विद्यमान आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसोबाची वाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. आणि त्या शिबिरामध्ये अनिकेत नाना भरणे अध्यक्ष भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसोबाची वाडी या शाळेला आठ कम्प्युटर ची घोषणा केली होती.
OPPO A78 4G । Oppo चा नवीन फोन लवकरच होणार लॉंच, ‘हे’ असतील धमाकेदार फिचर; जाणून घ्या सविस्तर
काल प्रमुख पाहुणे म्हणून संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या हस्ते भरणेवाडी येथे ग्रामसचिवालय या ठिकाणी मामाच्या हस्ते व ताईंच्या हस्ते आमच्या जिल्हा परिषद शाळेला कम्प्युटर देण्यात आले. संदीप मारुती चांदगुडे (उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस) यांच्या प्रयत्नातून कम्प्युटर मिळाले आहेत.
या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माननीय सचिन सपकाळ तसेच संजय गांधी निराधार, योजनेचे माजी अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर, तसेच इंदापूर तालुक्याचे सोशल मीडियावर काम करणारे हामा पाटील, इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अतुल झगडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Hero पासून TVS पर्यंत ‘या’ शक्तिशाली मोटरसायकल खरेदी करा फक्त 80 हजारांमध्ये; जाणून घ्या अधिक..