मुंबई | मुंबईत शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी हलक्या पावसानंतर सायंकाळी मुंबईत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे मुंबईतील सखल भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अंधेरी, मलाड, दहिसर भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने वाहतूक बंद करावी लागली. सर्वात वाईट स्थिती अंधेरी सबवेची आहे, तिथे अनेक वाहने पाण्यात अडकल्याचे दिसत आहे.
75 व्या वर्षी तिला हवा होता जोडीदार पण… लग्नाच्या नावाखाली महिलेची लाखो रुपयांची फसवणूक
घटनास्थळी उपस्थित असलेल्या ट्रॅफिक वॉर्डनने एका महिलेला वाचवले, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मुंबईत रविवारीही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, सध्या पाऊस संथ असून सर्व वाहतूक सुरळीत आहे. मात्र गोवंडी परिसरात नाला साफ करताना दोन मजुरांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाल्याची एक भीषण दुर्घटना मुंबईत शनिवारी घडली आहे.
Kuljit Pal Passed Away । ब्रेकिंग! चित्रपटसृष्टीवर शोककळा, प्रसिद्ध निर्मात्याचे निधन
दरम्यान, मुंबईमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर पुण्यामध्ये पुढील 4-5 दिवस मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज रात्री जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
धमाकेदार ऑफर! अवघ्या 999 रुपयांना घरी आणा वनप्लस, सॅमसंगचे 5G फोन, कसं ते जाणून घ्या