
Tiger Memon Photo । टायगर मेमन (Tiger Memon), मोस्ट वॉन्टेड डॉन. टायगरने १९९३ साली मुंबई साखळी बॉम्बस्फोट (Mumbai serial blasts) घडवून आणला होता. मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ (Mumbai serial blasts 1993) रोजी अवघे २ तास १० मिनिटांत मुंबईत एकापाठोपाठ एक १३ बॉम्बस्फोट झाले होते. यात २५७ लोक ठार तर १४०० लोक जखमी झाले होते. बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim), टायगर मेमन आणि त्याचा भाऊ युसूफ मेमनसहित (Yusuf Memon) इतरांचं नाव पुढे आलं होतं. बॉम्बस्फोटानंतर दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमनने पळ काढला. (Latest Marathi News)
Kangana Ranaut । बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ करणार राजकारणात एंट्री, वडिलांनी केला मोठा खुलासा
टायगर मेमनला पाकिस्तानने (Pakistan) आश्रय दिला होता. त्याच्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. टायगर मेमन कराचीत असून त्याचा पत्ता (Tiger Memon addresses) माहीत असल्याचा दावा एका हिंदी वृत्तवाहिनीने केला आहे. कराचीत संरक्षित परिसरात बांधलेल्या एका बंगल्यात तो राहत असून बंगल्याभोवती कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे.
Crime News । खळबळजनक! जावयानं संपवलं सासरचं संपूर्ण कुटुंब, धक्कादायक आलं कारण समोर
इब्राहिम मेमन असे टायगर मेमनचे खरे नाव असून त्याचे कुटुंब मुंबईचे होते. टायगरचे वडील व्यापारी होते. मुंबईतील भिंडी बाजार परिसरात पत्नी हनीफा आणि सहा मुलांसोबत ते राहत होते. मेमन कुटुंबातील सर्वात लहान मुलगा म्हणजे टायगर मेमन 80 च्या दशकात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपर्कात आला. महत्त्वाचे म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट असणारा टायगरचा दुसरा भाऊ याकूब मेमनदेखील यामध्ये अडकला.
Donald Trump । कोर्टाचा डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का! लढवता येणार नाही निवडणूक; कारण…